Author Topic: किनारा....  (Read 1223 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
किनारा....
« on: October 25, 2013, 03:21:17 PM »
नकोय मला तो
सागर किनारा,
पैलतीर न दिसणारा,
त्याच त्या रेघोट्या
वाळूवरल्या !

नकोय मला
ते किल्ला रचण
स्वप्नांचा,
त्या वरला ध्वज,
तूझ्या दुपट्याचा !

तरीही, डुंबेन मी,
त्याच अथांग सागरात,
ज्याच्या लाटा,
थडकाताहेत किनाऱ्यावर,
जेथे तू उभी आहेस !© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com   +91 9422779941

Marathi Kavita : मराठी कविता