Author Topic: प्रेम म्हणजे काय...???  (Read 2047 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
प्रेम म्हणजे काय...???
« on: October 27, 2013, 10:37:41 PM »
ती चांदणी त्या चंद्रावर जरा
जास्तच प्रेम करत होती
पण त्या चंद्रास धरतीची
ओढ लागली होती

इकडे माझ्या हृदयाचीही
घालमेल झाली होती
फक्त एकदा भेटण्यास तिला
या नयनांना आतुरता लागली होती

गुडघे टेकून धरतीवर मग
त्या चंद्रास मी विनवणी केली
शेवटी अखेरीस त्याला
त्याच्याच प्रेमाची आन दिली

मग अचानक न जाने
काय जादुगरी झाली
एक लखलखती चांदणी
माझ्यासमोर तुटून गेली

ती मला भेटेल,या गोष्टीला   
कौल देऊन गेली
त्या चंद्राच्या निस्सीम
प्रेमाचीही तिने साक्ष दिली

ज्या चंद्रावर प्रेम करून-करून झुरून गेली
शेवटी त्याच्याच प्रेमासाठी मरून गेलि
आम्ही जिंकूनही हरलो
आणि ती चांदणी हारुनही जिंकून गेली 

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता