Author Topic: ऋतू प्रेमरंगी  (Read 1163 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
ऋतू प्रेमरंगी
« on: October 31, 2013, 09:36:29 AM »
पहिल्यांदाच वृत्तात लिहिलेली कविता …
एक प्रयत्न …. त्रुटी आढळल्यास अवश्य कळवा …. तसेच दुरुस्तीही सुचवा ……

वृत्त भुजंगप्रयात-

ल गा गा    ल गा गा    ल गा गा    ल गा गा
१  २  २     १  २  २     १  २  २     १  २  २

ऋतू प्रेमरंगी

मला आठवेना, तुला आठवेना
कशी  कोण जाणे, कधी भेट झाली ……
 
कशी सांज आली, कधी रात झाली
कळेना जराही, मलाही तुलाही ……

नभी चांदण्यांची, किती आज गर्दी
सखी ये जराशी, अशी बाहुपाशी……

अता सोसवेना, दुरावा जराही
सखी सांजवेळी, जरा घे उभारी ……

नको साथ सोडू, अश्या सांजवेळी,
नको बंध तोडू, ऋतू प्रेमरंगी……

तुझा ध्यास सखये, किती प्रीत न्यारी
कळेना तरी, का मना वेड लावी ???

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: ऋतू प्रेमरंगी
« Reply #1 on: October 31, 2013, 08:33:41 PM »
Milind ji kasakay jamate he sarva...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ऋतू प्रेमरंगी
« Reply #2 on: November 01, 2013, 09:04:20 AM »
Prajunkush,

काय सांगू ,
वेडच लागलेय आज काल मला वृत्त अन मात्रांचे….  :D :D :D

thanks a lot ........ :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ऋतू प्रेमरंगी
« Reply #3 on: November 01, 2013, 09:05:02 AM »
Sagar Bade,

thanks...... :)