Author Topic: प्रेमात पडायचं नव्हतं ……………. संजय निकुंभ  (Read 1990 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रेमात पडायचं नव्हतं ……………. संजय निकुंभ
==========================
नको ते प्रेम अन प्रेमातले चांदणे
नको त्या वेदना अन प्रेमातले विव्हळणे
ठरवलं होतं यापासून दूरचं रहायचं
प्रेमाबिमाच्या भानगडीत नाही पडायचं

तू आली जीवनात अन प्रेमाची ठिणगी पडली
नकळत हृदयास ती आग पेटवत गेली
किती ठरवलं आपण आपल्या कोषातच रहायचं
नियतीने ठरवलं होतं आयुष्य कसं जगायचं

राहत गेलो दूर तरी तुझ्याकडे खेचला गेलो
माझ्या मनाच्या आभाळात तुझं चांदण बघतं गेलो
तुझीही साद होती तुझीही साथ होती
तुझ्यात डूबत डूबत मलाच विसरत गेलो

आज तुला पाहण्यासाठी तिळ तिळ तुटतो मी
तुझा आवाज ऐकण्यासाठी वेडापिसा होतो मी
इतकी तू विसरशील मज नव्हते ठाऊक
नाहीतर हे पाऊल मी पुढे टाकलंच नसतं

कशी तक्रार करू तुझी तुझ्यामुळे प्रेम कळलं
विरहाच्या आगीत जळण्याच भाग्य मज मिळालं
विचार माझा खरा होता प्रेमात न पडण्याचा
तू आयुष्यात येणं माझ्या हातात नव्हतं .
----------------------------------------------------
दि. ५ .११ .१३ वेळ : ५ .४५ स.