Author Topic: शोनू एकदा तरी सांगशील का मला, तुझ्यासाठी काय करावं मी ???  (Read 1910 times)

शोनू एकदा तरी सांगशील का मला,
तुझ्यासाठी काय करावं मी ???

तुझ्या ओठांच हसू होवू की,
तुझ्या डोळ्यातील अश्रूं बनावं मी,
तुझ्या कुशीतील उशी होवू की,
तुझ्या मिठीतला स्पर्श व्हावं मी.....

तुझ्या गालांची लाली होवू की,
तुझ्या कानातले झुमके बनुन डुलावं मी,
तुझ्या कपाळाची टिकली होवू की,
तुझ्या भांगेतलं कुंकू होवून चेह-यावर शोभावं मी.....

शोनू एकदा तरी सांगशील का मला,
तुझ्यासाठी काय करावं मी ???

तुझ्या पायातली पैँजन होवू की,
तुझ्या हातातील कंगण बनावं मी,
तुझ्या ओठांचा गोडवा होवू की,
तुझ्या डोळ्यातलं काजळ व्हावं मी.....

तुझ्या केसातलं फूल होवू की,
तुझ्या मनातल ओळखणारा बनावं मी,
तुझ्या आयुष्यातला क्षण होवू की,
तुझ्या हक्काचा जोडीदार बनुन रहावं मी.....

शोनू एकदा तरी सांगशील का मला,
तुझ्यासाठी काय करावं मी ???
 :-*  :P  :-*

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०८-११-२०१३...
दुपारी ०२,३१...
© सुरेश सोनावणे.....