Author Topic: तुझ्यावर इतकं केलं प्रेम की  (Read 2539 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तुझ्यावर इतकं केलं प्रेम की
==================
समुद्र मंथनावेळी
शंकराने सारं विष
प्राशन करून टाकलं
तसचं तुझ्या प्रेमभंगाच्या
साऱ्या कडू आठवणींना
मी पिऊन टाकलं

रोमारोमांत भिनवून टाकले
तुझे न माझे प्रीतीचे क्षण
ते बेधुंद क्षण घेऊनच
माझं मन जगू लागलं

आज तुलाही आश्चर्य वाटत असेल
इतक्या कशा प्रेमकविता
करतोय मी वेड्यासारख्या
पण तुझ्या प्रत्येक आठवणींना
माझ्या शब्दा शब्दात मी गुंफून टाकलं

तुला वाटत असेलही
माझ्याही जीवनात कुणी आलं
पण तुझ्यावर इतकं केलं प्रेम की
कुणावर प्रेम करण्यासाठी
माझ्याजवळ प्रेम शिल्लकच नाही राहिलं .
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १३ . ११ . १३  वेळ  : १० . ०० रा.