Author Topic: || रुसवा ||  (Read 2110 times)

Offline pujjwala20

 • Newbie
 • *
 • Posts: 45
|| रुसवा ||
« on: November 17, 2013, 10:35:04 PM »
रुसवा

तुझ्यावर रुसनच
माझ्यकडून होत नाही
काहीही असल तरी
मन त्यासाठी धजवतच नाही
राग, रुसव्यामध्येही
असतो म्हणे प्रेमाचा ओलावा
वाटत कधी कधी
त्याचाही आनंद तुला द्यावा
लटका राग आनून
गाल, नाक फुगवून
तूझ्याशी न बोलून
बसाव म्हणते रुसून
पण तुला ठाऊक न राजा
किती वेड माझ मन
तू दुखावला गेला असशील
म्हणून तेच बसत गहिवरुन
तेच बसत गहिवरुन...;-(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,266
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: || रुसवा ||
« Reply #1 on: November 18, 2013, 11:58:29 AM »
मस्त.......

Offline pujjwala20

 • Newbie
 • *
 • Posts: 45
Re: || रुसवा ||
« Reply #2 on: November 18, 2013, 12:19:08 PM »
धन्यवाद