Author Topic: तुला आयुष्याची जोडीदार निवडले मी.....  (Read 1856 times)

पहील्यांदा जेव्हा तुला,
स्वप्नात पाहीले मी,
तेव्हाच तुला आपली,
बनवायची ठरवले मी.....

तुझ्या येण्याने बदलले,
दुःखाने भरलेले आयुष्य माझे,
जेव्हा तुला खरं तर,
मनापासून जाणले मी.....

तुझ्या हसण्यात हसायचो मी,
तुझ्या रडण्यात रडायचो मी,
तु भांडलीस की शांत बसायचो मी,
तु रुसलीस की मनवायचो मी.....

तुझी समजुत काढताना,
स्वतःलाच विसरायचो मी,
तुझ्या नकट्या नाकाला,
निहाळत रहायचो मी.....

तु कोण कशी होतीस,
तु काय कोठून होतीस,
हे कधीच न जाणण्याचा,
प्रयत्न केला नाही मी.....

तु फक्त माझी होतीस,
माझ्यावर प्रेम करत होतीस,
माझ्या भोवताली दरवळायचीस,
तुला आयुष्याची जोडीदार निवडले मी.....

तुला आयुष्याची जोडीदार निवडले मी.....
:-D  :-P  :-D

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १९-११-२०१३...
दुपारी ०१,४६...
© सुरेश सोनावणे.....