Author Topic: मला कुठे जमतं , तुझ्यावर चार शब्द बोलायला....  (Read 3694 times)

मला कुठे जमतं 
तुझ्यावर  चार शब्द  बोलायला .....

तुझ्या सौंदर्याचे  कौतुक माझ्याच मुखाने करायला

तु म्हणतेस तुला जराही माझी किंमत नाही
पण हृदयाला कोण  समजावेल

वेळच  नसतो त्याला तुझ्यावर लिहलेल्या कवितांना
ओठांशी आणून तुला माझ्या मोहात पाडायला.....
-
© प्रशांत डी शिंदे
दि .२०/११/२०१३
स. १०.३५ मि..