Author Topic: किती छान असतं ना , पहिल्या प्रेमात पडणं..............  (Read 2408 times)

किती छान असतं ना , पहिल्या प्रेमात पडणं
एकटेपणाच्या बाहुंतून मुक्त होऊन
प्रेमाने डोके टेकावनं......

असे तर नजरांना थारच नसते
का कुणास ठाऊक
कुणास शोधत असतात  नजरा
पण तुला पाहता तुझ्याकडेच थांबतात ह्या नजरा...........

माझ्याकडे पाहून  तुझे स्तुतिसुमने थांबतच नाही
तुझे समजावणे पाहून दूरच जाऊ नये वाटतं
खरेच का प्रेमात असेच काही असतं
पहिल्या प्रेमाची स्वप्नेच  खूप  गोड असतात .........खरेच पहिले प्रेम म्हणजे गोड  आठवण असते

किती छान असतं ना , पहिल्या प्रेमात पडणं
 

म्हणूनच तर पहिल्या प्रेमाला दृष्ट  कधी न लागावी
आयुष्य हे सुखाने जोडीने आपण जगावी ..........
-
© प्रशांत डी शिंदे

दि .२२/११/२०१३
स. १०:०० मि