Author Topic: आता कुठे  (Read 1321 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
आता कुठे
« on: November 23, 2013, 07:51:10 AM »
आता कुठे ……………………संजय निकुंभ
==========
आता कुठे आयुष्याला बहर आलाय
हीच वेळ आहे चांदण लुटून घेण्याची
मनासारखं प्रेम उधळून देण्याची
बेधुंद अन बेफाम आयुष्य जगण्याची

आता कुठे पाऊल टाकलंय तू
२१ व्या वर्षाच्या पदार्पणात
तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागल्यात उन्मादक भावना
प्रीत जगलीस तरच अर्थ येईल जगण्यात

सुगीच्या दिवसातच पीकं असतात घ्यायची
नाहीतर ते क्षण पुन्हा कधीच नाही भेटत
नको करूस तू आता जगाचा विचार
जग तुझ्या विचारावर नाही चालत

सूर्य जसा मध्यावर आल्यावर तेजाळतो
तसा तुझ्या तारुण्याला बहर आलाय
तुझ्या डोळ्यांत दिसतेय मला
प्रीत फुललेली अन माझ्यासाठी आसुसलेली

हे क्षण तू घ्यावेस ओंजळीत भर भरून
उनाड वारा होऊन तू सामावून जां माझ्या मिठीत
आता कुठे आपलं प्रेम मनामनांत फुललयं
विसरून जां तू नुकतंच पाऊल टाकलंय चाळीशीत .
================================
संजय एम निकुंभ
 वसई  दि . २३.११.१३  वेळ : ७ . ३० स.     

Marathi Kavita : मराठी कविता