Author Topic: तिला कविता शिकायची होती  (Read 1288 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
आज भेटायला आली ती मला
अन कविता शिकण्याचा हट्टच केला. 

म्हंटली 'शब्दांशी खेळायचय रे मला'
'आठवणींच्या कविता रचायच्यात रे मला'.
मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला,
पण तिने मात्र अबोलाच धरला.

मग शेवटी सांगितल मी तिला,
'अग हे शब्द म्हणजे पहिल्या प्रेमाचा खुलासा'
कुणाच्या प्रेमळ आठवणीतला हळुवार दिलासा
पण विरहात मात्र हेच रडवतात ग ढसाढसा   

हे ऎकताच राग तिचा पळून गेला
अन कवितेचा ध्यास मिठीत माझ्या सुटला
कळल नाही हा सगळा मेळ कसा जुळला…??
की हा पराक्रम पण माझ्या शब्दांनी केला…??

@सतीश भूमकर....