Author Topic: मराठमोळी  (Read 2103 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
मराठमोळी
« on: November 27, 2013, 12:30:17 PM »
मराठमोळी

ही मराठमोळी
गाली हिच्या लाज लाली
नको नजरानजर विखरी
सदा नजर हिची खाली
तरी हिची सावध नजर
हेरी प्रत्येक चाली
नजर जरी खाली
तरी ताठ बाणा
स्वत्व टिकवी स्वतःचे
न जाई हार कुणा
स्वकत् त्ववानाची असे
भुरळ जिला
एक प्रेमच फक्त
जिंकू शकेल तिला

~ उज्ज्वला

Marathi Kavita : मराठी कविता


एक रेशिमगाठी

  • Guest
Re: मराठमोळी
« Reply #1 on: July 28, 2014, 09:13:29 PM »
गोड आहे.......

मनापासुन मराठपणा आवडला.....