Author Topic: प्रतिबिंब  (Read 978 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रतिबिंब
« on: November 28, 2013, 06:50:48 PM »
प्रतिबिंब ………………………… संजय निकुंभ
==========

तू नटून थटून आलीस की
विकेट माझी पडते
तू साधी सुधी आलीस तरी
दांडी गुल होते

तुझ्या कुठल्याही रुपाची
मोहिनी मज पडते
तुला पाहताच सखे
माझे भान हरवते

असे कसे इतके तुझे
वेड मज लागते
तुझ्याच धुंदीत माझे मन
सतत फिरत राहते

असे कसे असते ना प्रेम
काही कळत नसते
माझ्या सावलीतही तुझेच
प्रतिबिंब दिसत असते .
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २८ . ११ . १३ वेळ : ६ .१० स.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
Re: प्रतिबिंब
« Reply #1 on: November 29, 2013, 01:22:59 PM »
सुंदर दोन जीव एक झाले की असच होत