Author Topic: जगाने ओळखलं कुठे अजून प्रेमाला  (Read 1169 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
जगाने ओळखलं कुठे अजून प्रेमाला
=======================
तुझ्या सावलीत दिसते
माझी सावली
माझ्या सावलीत दिसते
तुझी सावली

इतकी एकरूपता कसं शक्य आहे ?
जगास पडलेला एकमेव प्रश्न
ज्याच उत्तर नाही मिळत जगाला

पण त्यांना कुठे ठाऊक आहे
तुझ्या अन माझ्या काळजावर
उमटले आहेत एकमेकांचे ठसे

एकमेकांची छबी
कोरली गेलीय हृदयावर
त्यामुळे जी सावली पडते
ती हृदयाच्या किरणांची असते

अन त्या पडछायेत
तू तिथे मी अन मी तिथे तू
दिसत असते जगाला

कितीही अदभूत वाटत असलं तरी
त्यांनी जाणलं कुठे अजून प्रेमाला .
======================
संजय एम निकुंभ , वसई
दि.२८.११.१३ वेळ : ७.३० संध्या .