Author Topic: तू भेटलीस आणि आसमंत उजळून आले  (Read 1195 times)

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
तू भेटलीस आणि आसमंत उजळून आले,
तू दिसलीस आणि रंग सारे उधळून आले.

तू हसलीस आणि ऋतू मनाचे बहरून आले,
तुझा स्पर्शाने  माझे तनमन थरारुन  आले.

तू चालतांना संगे गंध वाऱ्यास धरून आले,
तू बोलताना आपुलकीने उगाच गहिवरून आले.

विसरलेले किनारे माझे  पुन्हा वळून आले,
नावेचे शीड माझ्या पुन्हा सळसळून आले.

तू आता माझीच हे जेव्हा कळून आले,
हरवलेले  स्वप्न नव्याने दरवळून आले.

तुझ्या डोळ्यात माझे स्वप्न तरळून आले.
पापण्यांवाटे  आनंदाचे मेघ ओघळून आले.


..........अमोल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
“तू आता माझीच हे जेव्हा कळून आले,
हरवलेले स्वप्न नव्याने दरवळून आले.
तुझ्या डोळ्यात माझे स्वप्न तरळून आले.
पापण्यांवाटे आनंदाचे मेघ ओघळून आले.”

या ओळी खूप छान रचल्यात रे !!