Author Topic: दूर राहुनी असे नको सतावूस तु.....  (Read 1920 times)

ये वेडे शोनू हे बघ,
असे काय केलेस तु.....

एका समजुतदाराला,
तुझे वेड लावलेस तु.....

ह्रदय तर चोरलेस,
मन ही तुझ्यात गुंतवलेस तु.....

येऊनी आयुष्यात माझ्या,
मजला आपलेसे केलेस तु.....

नको देवूस आता दुरावा,
तिरक्या नजरेने असे नको पाहूस तु.....

सत्यात अवतर ग आता,
स्वप्नात नको छळूस तु.....

दिलेले प्रेमाचे वचन तुझे,
खोटे नको ठरवूस तु.....

आसुरलेल्या नयनांना या,
वाट पाहायला लावूस तु.....

होऊ दे आज भेट खरीखुरी,
दूर राहुनी असे नको सतावूस तु.....

दूर राहुनी असे नको सतावूस तु.....
 :P   :-*   ;)

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ०५-१२-२०१३...
सायंकाळी ०७,४७...
© सुरेश सोनावणे.....