Author Topic: अनेकांच्या रूपा मध्यें...  (Read 1243 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
अनेकांच्या रूपा मध्यें
एकच तुझे रूप दिसते
आभास समजून आला तरी
मन मात्र कायम फसते

अचानक शब्द कुणाचा
तुझी आठवण करून देतो
आभास तो वाटला तरी
चटकन मागे वळून बघतो

पावलांच्या चाहुलीनें
तूं आलीस असे वाटते
आभास समजून आला तरी
न कळत दार उघडले जाते

स्वप्नां मध्यें अनेक वेळा
तुला मी पहात असतो
तो आभास असला तरी
मला आनंद वाटत असतो
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास
...Please click on this...
http://www.kaviravi.com/2013/06/inspirational-poem_26.html

Marathi Kavita : मराठी कविता