Author Topic: तु  (Read 1750 times)

Offline KP

 • Newbie
 • *
 • Posts: 4
तु
« on: December 13, 2013, 12:47:16 PM »
           तु
अखंड चालणाऱ्या कालचक्रात
वेळ विसरावयास लावलीस मला
हवी होतीस जेव्हा
तेव्हा सोडून गेलीस मला
मी दूर गेल्यावर
माझी आठवण येईल तुला
आसुसलेल्या नयनासंगे
अश्रू साथ देईल तुला
वाट पाहता पाहता मिलनाची
स्वैर भेर होईल हा वारा
तृप्ती देऊनही धरणीला
निस्तेज त्या वाटतील धारा

// के. पी . //

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तु
« Reply #1 on: December 14, 2013, 11:14:00 AM »
छान .... :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: तु
« Reply #2 on: December 14, 2013, 11:50:00 AM »
Va..Va... chaan