Author Topic: मी, ती आणि तो... पाउस  (Read 1306 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मी, ती आणि तो... पाउस
« on: December 14, 2013, 11:05:57 AM »
मी, ती आणि तो... पाउस


पावसाचा थेंब वारा, येई अंगावरी शहारा !!

सर पावसाची हलकेच येऊन गेली,
तुझ्या कुंतलाची पांघरून शाल गेली !
अलगद कवेत जीव उबदार झाला
श्वासात श्वास जसा प्राणवायू पाझरावा !

पावसाचा थेंब वारा, येई अंगावरी शहारा !!

केंव्हातरी वाटते असे रोज घडावे
उधळून सूर पावसाने चिंब गोठवावे !
तळव्यावर थेंबाचे मोर नाचतांना
धुक्यातील दवांनी धरू नये दुरावा !

पावसाचा थेंब वारा, येई अंगावरी शहारा !!

पानांतल्या फुलांनी हलकेच डोकवावे
फुललेल्या फुलांनी गोड स्मित दयावे,
लखलखत्या नृत्याने मृदगंध दरवळावा
रंगानी इंद्रधनुच्या मयूर हि शरमावा !

पावसाचा थेंब वारा, येई अंगावरी शहारा !!©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मी, ती आणि तो... पाउस
« Reply #1 on: December 14, 2013, 11:11:06 AM »

शिवाजी,
खूप छान ..... :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: मी, ती आणि तो... पाउस
« Reply #2 on: December 14, 2013, 11:48:26 AM »
Thanks a lot..... :)