Author Topic: तू आणि मी  (Read 1498 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
तू आणि मी
« on: December 18, 2013, 02:23:51 PM »
तू आणि मी,अशी फक्त
कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ असावी
गुलमोहराचा बहर,आणि तिथेच
आपली भेट असावी
जसे एखाद्या पाखराची,गोड
ड्रीम डेट असावी
...
तू मात्र
आवडत्या,आकाशी रंगाच्या पोशाखात
असावी
आकाशालाही हेवा वाटावा ,इतकी तू
सुंदर दिसावी
रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,प्र
ेमाची पण ओढ असावी
एकमेकात गुंतून
जाताना,परतीची मात्र
तमा नसावी
निरोप
घेताना डोळ्यां मध्ये,अश्रुची एक
झलक दिसावी
डोळ्यां मधले भाव
जाणुनी,नाजुकशी ती मिठी असावी
जीव
ओतला तुझिया पाई,आशा तुझीही हीच
असावी
एकांताची साथ अशी हि,
दरवेळी रम्य असावी.
Sanchuprem

Marathi Kavita : मराठी कविता