Author Topic: खरच ग आई ....  (Read 1555 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
खरच ग आई ....
« on: December 19, 2013, 02:55:29 PM »
खरच ग आई आज फार रडु आलय,
तुझ्या प्रेमाच गूढ मला कळलय,

कशी ग आई रात्र रात्र जागायची,
माझ्यासाठी तु रात्रच विसरायची,

तुझ्या कुशीमधली ऊब किती छान होती ग आई,
दहा हजाराच्या रजईत पण ती मिळत नाही ग आई,

शाळेत गेल्यावर फक्त तुलाच माझी काळजी,
शाळा सुटेपर्यंत तु वाट पाही माझी,

हळु हळु माझ बालपण गेल,
तुझ्या संस्कारांच त्याला आवरण आल,

तुझ्यापासुन दुर जातांना फार गहीवरलय मला,
बालपणीचा प्रत्येक क्षण आठवतोय ग मला.


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता