Author Topic: आवड  (Read 1735 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
आवड
« on: December 22, 2013, 12:57:47 PM »
आवड
   
नुकतीच वाढलेली दाढी
तिला आवडायची,
घातलेला विटकरी शर्ट
अन मी सुद्धा !

छोटयाश्या हातवाऱ्यासह
मला आवडायची,
मान उचावून बोलतांना !

ग्यादरिंग संपल्यावर
तिला आवडायचो
अलगद घरी सोडतांना !

कुठूनशी भांडून आल्यावर
आवडायची, अश्रू तीचे
रुमालाने माझ्या टिपताना !

खाद्यावर डोक ठेऊनही
मला आवडायची
शांत चित्रपट पहातांना !

सतत बोलत असता
आवडायचो मी,
वाळूवर रेघोट्या मारीत,
गीतेचे श्लोक म्हणतांना !

अन ती, सुद्धा आवडायची
छोटयाश्या हातांवर
शिंपले शुभ्र निवडतांना


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता