Author Topic: कसा जाऊ तुझ्यापासून दूर  (Read 2491 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कसा जाऊ तुझ्यापासून दूर
=================
मी जाऊ पहातोय तुझ्यापासून दूर
अगदी दूर दूर
भटकतोय या विश्वापासून
दुसऱ्या विश्वापर्यंत 
पण कुठल्याही विश्वात गेल्यावर
तूच दिसतेस मला

हा वेडाचार आहे
की तू केलेली भानामती
तुला विसरण्याच्या नादात
तूच आठवत रहातेस
कळत नाही
इतकं कसं झपाटून टाकलंय तू मला

मी कुठेही गेलो तरी
काय फरक पडणार आहे
कितीक धावणार आहे मी ……
माझ्या मनाच्या विश्वात
जेव्हा जेव्हा डोकावतो
तेव्हा तेव्हा तूच गवंसतेस मला

एक मात्र कळून चुकलंय
जे प्रेम ठरवून झालं नाही
ते कितीही ठरवलं तरी
काढू शकत नाही हृदयातून
कारण त्या प्रेमानं
पूर्ण विळखा घातलाय माझ्या आत्म्याला .
===========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २६.१२.२०१३ वेळ : ७ . ३० रा .