Author Topic: एक गुलाब मी दारी माझ्या लावला  (Read 1865 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
एक गुलाब मी
दारी माझ्या लावला
ऊन-पावसापासून वाचवत
जीवापाड मी जपला…

तरी न जाणे का तो,
पिवळ्या पाणातच जखडला
अन आजपर्यंत एकही
गुलाब त्यावर न बहरला…

पण आज बागेत आली
माझी सोनपरी फुलं वेचायला
अन जाता-जाता स्पर्शून
गेली त्या सुकलेल्या झाडाला….

दुसऱ्या दिवशी पहाटे
मग चमत्कार झाला,
अन तिच्या नुसत्या स्पर्शाने
सुकलेला गुलाब बहरून आला.

पण आता तीच सोडून
गेली मला एकट्याला,
फक्त आठवण म्हणून उरलाय
दारात तो गुलाब जळालेला….
 
@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):