Author Topic: प्रेमात हारुन जिँकलेला, एकमेव प्रियकर ठरेल मी.....  (Read 2049 times)

तुझ्याविणा होईल एकटा,
तुटून तडफडेल मी.....

तुझ्यापासून दुरावून,
हसतांनाही रडेल मी.....

तु भेटशील तर,
फुलांनसारखं हसेल मी.....

तु माझी नाही होणार तर,
जिवंतपणी मरेल मी.....

तुला मिळवलं तर,
मरुनही जगेल मी.....

जर हे खरोखर घडलं,
तर खुप नशिबवान ठरेल मी.....

प्रेमात हारुन जिँकलेला,
एकमेव प्रियकर ठरेल मी.....

एकमेव प्रियकर ठरेल मी.....
;)   :D   ;)   :D   ;)

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक २७-१२-२०१३...
सांयकाळी ०६,००...
© सुरेश सोनावणे.....