Author Topic: आज तिची माझी पहीली भेट होती, ओळख मात्र जुनीच होती.....  (Read 2175 times)

आज तिची माझी पहीली भेट होती,
ओळख मात्र जुनीच होती.....
*******************************
बरेच काही सांगायचे होते,
खुप काही ऐकायचे होते,
नजरेशी नजर भिडली,
डोळ्यात चमक मात्र तीच होती.....
*******************************
आज तिची माझी पहीली भेट होती,
ओळख मात्र जुनीच होती.....
*******************************
अबोल ओठावर शब्द दाटले होते,
डोळ्यातील अश्रूं आटले होते,
हूंदका देत दोघे रडत होतो,
भावना जपण्याची सवय मात्र जुनीच होती.....
*******************************
आज तिची माझी पहीली भेट होती,
ओळख मात्र जुनीच होती.....
*******************************
हिँमत करुन विचारले मी तिला,
" का गं सोडून गेलीस मला ???
या प्रश्नाला उत्तर न देण्याची,
अबोल पध्दत मात्र तीच होती.....
*******************************
आज तिची माझी पहीली भेट होती,
ओळख मात्र जुनीच होती.....
*******************************
खुप राग होता सोन्या तुझा मला,
म्हणुन एकटं सोडून गेले मी तुला,
प्रेमाने समजावून सांगून गोड हसायची,
तिची जादू मात्र जुनीच होती.....
*******************************
आज तिची माझी पहीली भेट होती,
ओळख मात्र जुनीच होती.....
*******************************
ह्रदयाची धड धड वाढत होती,
मनात पुन्हा ती भरत होती,
हातात हात घेऊन लाजण्याची,
चेह-यावरील निरागसता मात्र तीच होती.....
*******************************
आज तिची माझी पहीली भेट होती,
ओळख मात्र जुनीच होती.....
*******************************
खूप काही बोललो एकमेकांशी,
खूप कडकडून भांडलो,
समजूतदारपणे भांडण मिटवून,
मिठीत घेण्याची अदा मात्र जुनीच होती.....
*******************************
आज तिची माझी पहीली भेट होती,
ओळख मात्र जुनीच होती.....
*******************************
I Love You Shonu...
मला परत सोडून जाऊ नकोस... 
[♥]  [♥]  [♥]  [♥]  [♥]

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)   

स्वलिखित -
दिनांक ०२-१२-२०१४...
दुपारी ०४,३३...
© सुरेश सोनावणे.....