Author Topic: प्रेमाच्या आणाभाका  (Read 1054 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रेमाच्या आणाभाका
« on: January 05, 2014, 06:38:28 AM »
प्रेमाच्या आणाभाका
==================
तुझ्या डोळ्यांत पहात होतो मी
प्रेमाची किरणे उमललेली
नजरेत पाहिल्यावर कळतं होतं
तू हि आहेस गुंतलेली

मी जेव्हा अबोल रहायचो
तू असायचीस भांबावलेली
दिसायचं तुझ्या हालचालीतून
तू हि आहेस आसुसलेली

मी तर कधीच तुझ्या प्रेमात
ठार वेडा झालो होतो
तुझ्या डोळ्यांत पाहता पाहता
कधीच गुंतून गेलो होतो

प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या
प्रिये आपल्या हृदयाने
म्हणून तू दूर असूनही
काळजात आहे तुझी प्रीत पेटलेली .
=======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३० . ११ . १३  वेळ :  ७ . ३० स.       


Marathi Kavita : मराठी कविता