Author Topic: माझी ती मैत्रीण अशीच असावी……  (Read 4124 times)

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .

खोटे बोललो की चटकन पकडून खुप  सुनावणारी ,
माझं काही चुकलं तरी मला सावरून वाट दाखवणारी ,
तिच्याही मनातलं नकळत मला सांगणारी
अन माझ्या मनातलं अलगद ओळखणारी ,
माझी ती मैत्रीण अशीच असावी……
ओरडल्यावर मला ती खुप तिखट वाटावी
अन लाडाने बोलल्यावर दुधावरच्या सायसारखी वाटावी  ,
मला तिचा गुंतलेला प्रोब्लेम हक्काने सांगणारी
अन माझा प्रोब्लेम चटकन मिनटात सोडवणारी ,
माझी ती मैत्रीण अशीच असावी……
कुठे हरवलो मी तर लगेच इंद्रधनुप्रमाणे क्षितिजावर दिसावी
अन दिसल्यावर 'विसरलास कारे मला' म्हणून जाब विचारणारी ,
कितीही तिखट आणि रागावणारी असली तरी ,
अन कधीच मला न विसरणारी आणि मला समजून घेणारी ,
माझी ती मैत्रीण अशीच असावी……

 मयूर जाधव ,
 (कुडाळ) सातारा ,
 +918888595857 .

 

     

Marathi Kavita : मराठी कविता


Mahesh salunkhe

 • Guest
khup chhan, mayur sir.

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Dhanyawad maheshji