Author Topic: निद्रा आज माझी  (Read 942 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
निद्रा आज माझी
« on: January 06, 2014, 11:32:11 AM »
निद्रा आज माझी

कशी कुठे पळाली

तव संगच्या स्मृतिंना

येई मनी उफाळी ।

 अव्यक्त भावना त्या

कां शब्दरूप घेती

दाबून ठेविल्या त्या

परि आज घे  उफाळी ।

 क्षण एक आठवितो

तवं साथीत घालविलेला

उठवितो तरंग आता

मनीं सांज जणु सकाळी ।

 पळ एक त्या स्मृतिंचा

युगा समान होतो

रंगुनि त्यात जातो न

म्हणुनि नीज ती उडाली ।

 जागून रात्री रात्री

काढीन त्या आतां मी

येऊ दे अशी परंतु

तव आठवणींना उफाळी ।

 जांच  होतो मनाला

जरी फक्त त्या स्मृतिंचा

साहीन सर्व ते कारण

लिहिले तेच भाळी । ।
रविंद्र बेंद्रे   
 कविता चित्ररुपात पहायची असल्यास...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/07/love-poem.html

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: निद्रा आज माझी
« Reply #1 on: January 06, 2014, 11:39:06 AM »
अति सुदंर