Author Topic: मिलन...  (Read 1440 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,268
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मिलन...
« on: January 09, 2014, 10:02:35 AM »
मिलन...

स्वप्न असे वेडयाचे, तरी गीत आहे मिलनाचे
चमचमती रात्र ही, भरले गगन चांदण्याचे !

येती मधुर स्वर ते, कानी शुभ्र लाटांचे,
झिंगावून जाती तना, अवखळ खेळ वायूंचे !

आले भरून हृद्य माझे, घेऊन सुगंध फुलांचे,
छेडताच गीत तू, प्रेम भऱ्या मस्तीचे !

घेतो चुंबन मी या, कोमल तुझ्या ओठांचे,
विस्मरू नकोस तू, गीत आहे मस्तीचे !

स्वप्न असे वेडयाचे, तरी गीत आहे मिलनाचे !

[/size]


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता