आता काही बोलू नकोस
या एकांताला बोलू दे
वादळानंतर विसावलेल्या
आसमंताला बोलू दे
द्वैत आणि अद्वैताच्या
सीमेवरती स्थिरावलेली
ही स्पंदनांची भाषा
वायूमुळे चालत आहे
शब्दंची कास केव्हाच सुटली
आता स्पंदनेही लंघून जाऊ
मग निर्वातासही व्यापून उरेल
त्या अनंताला बोलू दे.
आता काही बोलू नकोस
या एकांताला बोलू दे
from collection