Author Topic: वाटते आता हवे,ते तुझे ......  (Read 1634 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
वाटते आता हवे,ते तुझे ......
« on: January 19, 2014, 01:25:08 PM »
प्रिये तुझ्या प्रेमात अता वाटते .....

वाटते आता हवे,
ते तुझे पाहणे...

पाहुनी डोळ्यात माझ्या,
ते तुझे लाजणे....!!

वाटते आता हवे,
ते तुझे हसणे...

गालावरच्या खळीत,
मन माझे गुतंले.....!!

वाटते आता हवे,
ते तुझे रुसणे....

मनवत तुझ्या मनाला,
कुशीत माझ्या बघणे....!!

वाटते आता हवे,
ते तुझे प्रेम करणे...

कुशीत घेवुन तुझ्या,
मला तुझ्यात हरवणे...

वाटते आता हवे,
ते तुझे स्पर्शिवणे...

स्पर्शनी तुझ्या ओठी,
श्वासाने बोलणे...!!
:::::::::::::::::::::::::::::::
@स्वप्नील चटगे©

« Last Edit: March 16, 2014, 12:33:21 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता