Author Topic: तुझ्यावर खुप प्रेम करतो मी.....  (Read 3625 times)

कधी कधी तुझ्यावर,
खुप रागवतो मी,
कधी कधी तुझ्याशी,
खुप भांडतो मी.....

कधी कधी तुझ्यावर,
खुप रुसतो मी,
कधी कधी तुला पाहून,
खुप लवकर मानतो मी.....

कधी कधी तुझ्यावर,
खुप ओरडतो मी,
कधी कधी तुला,
खुप बडबडतो मी.....

कधी कधी तुझ्यावर,
खुप हसतो मी,
कधी कधी तुझ्यासाठी,
खुप रडतो मी.....

कधी कधी तुला,
खुप दुःखवतो मी,
कधी कधी तुला,
खुप चिडवतो मी.....

कधी कधी तुझ्या,
खुप जवळ येतो मी,
कधी कधी तुला,
चटकन मिठीत घेतो मी.....

कधी कधी तुला,
खुप छळतो मी,
कधी कधी तुला,
खुप मिस करतो मी.....

हा सगळा माझ्या प्रेमाचा,
एक भाग आहे गं पिल्लू,
तुला कधीच न गमवण्याच,
माझं प्रण आहे गं शोनू.....

तुला आयुष्यभर साथ देण्याच,
माझं वचन आहे गं जानू,
तुला माझी जोडीदार करण्याच,
माझं स्वप्न आहे गं वेडू.....

कारण ???

तुझ्यावर खुप प्रेम करतो मी.....

प्रेम करतो मी.....

I Love You Pillu...
:-*  :-*  :-*  :-*  :-*

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २१-०१-२०१४...
दुपारी ०४,५७...
© सुरेश सोनावणे.....