Author Topic: स्वर्ग सुख अनुभवले...  (Read 1454 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
स्वर्ग सुख अनुभवले...
« on: January 25, 2014, 12:06:54 PM »
त्या क्षणी होतो
आपले आपण दोघ
समोर आपल्या होता
सागर तो अथांग
हातात माझ्या होता
शोना हात तुझा
मनात मात्र होता
फ़क्त ध्यास तुझा
मधेच तुझे लाजणे
चोरून गुपचुप पहाणे
तुला तसे पाहून
मनात माझे हसणे
सहज तुझ्या कमरेत
माझा हात गेला
माझ्या तशा स्पर्शाने
तुला शहारा आला
लाजली होतीस तू
नजर होती खाली
ओठ होते थरथरत
ह्रदय वर खाली
त्या क्षणी माझेही
भान होते हरपले
घ्यावे मिठीत तुला
मनी होते ठरवले
वेळ न दवडता
जवळ तुला ओढले
अगदी त्याच क्षणी
स्वर्ग सुख अनुभवले...
स्वर्ग सुख अनुभवले...

... अंकुश नवघरे
... Ankush Navghare

Marathi Kavita : मराठी कविता