Author Topic: प्रेमात पडलं की  (Read 4718 times)

Offline rupesh baji

  • Newbie
  • *
  • Posts: 17
प्रेमात पडलं की
« on: August 10, 2009, 08:45:16 PM »
प्रेमात पडलं की..
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

तिचं बोलण,
तिचं हसण;
जवळपास नसूनही
जवळ असण;
जिवणीशी खेळ करीत
खोटं रूसण;
अचानक स्वप्नात दिसण!

खट्याळ पावसात
चिंब न्हायच!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

केसांची बट तिने
हलूच मागे सारली...
डावा हात होता
की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण
मनात आपल्या साठवतो!

ती रुमाल विसरून गेली!
विसरून गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण
मनात आपल्या साठवतो!

आठवणीचं चांदण असं
झेलून घ्यायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

तिची वाट बघत आपण उभे असतो...
ठरलेली वेळ कधीच टळलेली!
येरझारा घालणसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर!
सगल्यांची नजर असते
आपल्यावरच खिळलेली!!

माणसं येतात,
माणसं जातात,
आपल्याकडे संशयाने
रोखून बघतात!

उभे असतो आपण
आपले मोजीत श्वास:
एक तास! चक्क अगदी एक तास!!

अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते!
अखेर ती उगवते!!

इतकी सहज! इतकी शांत!
चलबिचल मुळीच नाही!
ठरलेल्या वेलेआधीच
आली होती जशी काही!!

मग तिचा मंजूळ प्रश्न:
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तर:
"नुकताच ग! तुझ्याआधी काही क्षण!"

कालावर मात अशी!
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

एकच वचन
कितीदा देतो आपण!
एकच शपथ
कितीदा घेतो आपण!

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात!
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात!!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजुक गत
आपल्या मनात वाजू लागते!!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरून जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असण सुगंधाने भरुन जातं!!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधलून द्यायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

-मंगेश पाडगावकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rupa_80

  • Newbie
  • *
  • Posts: 19
Re: प्रेमात पडलं की
« Reply #1 on: August 24, 2009, 11:10:06 PM »
 :)

Tejas Kamble

  • Guest
Re: प्रेमात पडलं की
« Reply #2 on: April 05, 2013, 02:10:06 PM »
awesome re mitra  ;)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):