Author Topic: हेच माझे प्रेम आहे...  (Read 7374 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
हेच माझे प्रेम आहे...
« on: January 29, 2014, 09:44:28 AM »
तू सोबत असलिस की वाटते
जगण्याला माझ्या अर्थ आहे
तू दूर गेलीस की वाटते
जीवनच सारे व्यर्थ आहे
सतत तुझ्यात स्वताला पहाणे
आता हेच माझे जीवन आहे
कुणी कहिहि म्हणो पण
हेच माझे प्रेम आहे....
तू रुसतेस कधी माझ्यावर
खूप गम्मत वाटते मला
तु हसतेस कधी माझ्यावर
माझाही ह्रदय हसते मला
मागणे आहे एक माझे
कायमचे रुसू नकोस कधी
नाहीतर म्हणावे लागेल
आता रोजचेच माझे मरण आहे
कुणी कहिहि म्हणो पण
हेच माझे प्रेम आहे...
सतत तुला मिस करतो मी
तुझ्यावर खुप प्रेम करतो मी
जागेपणी झोपेत स्वप्नात
तुला अणि तुलाच पाहतो मी
कधी गेलीस सोडून कायमची
अखेरचा श्वासही म्हणेल की
जरी तुला नसेल प्रेम तरी
फ़क्त तूच माझे प्रेम आहे
कोणी कहिहि म्हणो पण
हेच माझे प्रेम आहे...
हेच माझे प्रेम आहे...

...अंकुश नवघरे
...Ankush Navghare

Marathi Kavita : मराठी कविता


bhimrao wevhal

  • Guest
Re: हेच माझे प्रेम आहे...
« Reply #1 on: February 04, 2014, 01:27:00 PM »
kavita far changli aahe manapasun aavadli............. :) :) :) :)

Laxman Devkamble

  • Guest
Re: हेच माझे प्रेम आहे...
« Reply #2 on: March 05, 2014, 07:40:24 PM »
khup chan