Author Topic: मी मला खूप नशीबवान समजते...  (Read 1876 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
मला असं इतकं आनंदी बघून ...
तू पण किती रे खुश होऊन जातो....

माझं हसणं बघून...
तू बघता बघता माझ्यातच हरवून जातो...

नजरेत नजर टाकून...
मला तुझ्याकडे खेचून घेतो...

अशी कशी रे जादू करतो...
खरतर तू तुझ्या प्रेमानेच मला जवळ करतो...

तुझ्या या प्रेमातच मी....

स्वछंदपणे वाहत असते...

गुणगुणत असते...

बावरत असते...

अन तू असाच माझ्याकडे हसून बघत असतो...

तुझ्या डोळ्यांमधल ते निस्वार्थी प्रेम पाहून...
मी मला खूप नशीबवान समजते...

मी मला खूप नशीबवान समजते...
 
- Suचित्रा  Sheडगे