Author Topic: तो एक क्षण तुझ्या माझ्या प्रेमाचा सदा साक्ष देत राहावा.......  (Read 2276 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
आठवणीत रमताना कुणाच्या कधीतरी,
  नकळत ओठांवर हसू फुलावे एकदातरी.....
अशी गोड आठवण साठवून मनात,
   का भास होतात दूरचे जवळ असण्याचे क्षणात......
डोळ्यात गोड स्वप्नांची एक रास रचताना,
  नकळत कधीतरी पापणी उघडता दोन थेंब सांडताना.......
विचारात कुणाच्यातरी स्वताला गुंतवावे,
  मनाचा तो आनंद सांगता न यावे......
लाजाळूच्या पानापरी हळूच लाजावे,
   कुणी समोर येताच पुन्हा स्वतास सावरावे.......
एका क्षणाचा तो मोह न मला आवरता यावा,
   आणि तो एक क्षण तुझ्या माझ्या प्रेमाचा सदा साक्ष देत राहावा........ @ कविता @