Author Topic: तिचे त्याचे प्रेम....  (Read 2289 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
तिचे त्याचे प्रेम....
« on: February 14, 2014, 08:50:58 PM »
तिचे त्याचे प्रेम म्हणजे
उधान वारे वाहने असते
नदी ओढा कालवा ओहळ
पाण्यास नाव देणे असते
गडद काळोखी जगात भरता
साथीस सदैव चांदणे असते
निबिड निर्जन गूढ वनात
पायी गुणगुण गाणे असते
तिची साथ असो नसो वा
तिच्याच साठी जगणे असते
कधीतरी नक्की भेटेन ती
म्हणून स्वप्न पाहणे असते
 
विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 12:28:55 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता