Author Topic: मनास बेभान करणारे गीत कुठून गुंजते........  (Read 1276 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
मनास असे बेभान करणारे हे गीत कुठून गुंजते,
  तुमची आठवण मनाचे चित्त सारखे वेधते.......
तुम्ही थोडे बोलावे अन तेच मी ऐकत राहावे,
  आणि ते क्षण कधी न विसरता यावे.......
शांत मी शांत तुम्ही हि, तरी या मनात लाटांची एक उमेद का उठावी,
  तुमचे स्वप्न पाहता रात्र न सरावी, अन तुम्ही येण्याची कानी साद यावी......
भास मनाचे कि सारे सत्य आहे,
  तरी का मनास तुमची ओढ आहे......
आयुष्याचा जोडीदार म्हणून तुम्हास निवडले,
  माझे मन हे त्याच क्षणी तुमचे झाले......
आयुष्याच्या प्रत्येक वाटा तुमच्या सोबत चालायचे आहे,
 तुमच्या सवे संसाराचे स्वप्न रंगवायचे आहे........
तुम्हीच आता या जीवनाचा अर्थ आहात,
 तुम्हीच माझ्या भावी जीवनाचा भावार्थ आहात....... @ कविता @