Author Topic: पाऊस आणि प्रेम  (Read 1722 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
पाऊस आणि प्रेम
« on: February 28, 2014, 03:19:01 PM »
पाऊस आणि प्रेम
वाटत नाही फरक
दोन्हीत तसं
साम्यही बरंच

पावसात असतो दुष्काळ
कधी ओला सुकाळ
प्रेमही कधी valentine
तर कधी break-up

दोन्हीचा संबधही
तसा अगदी खराच
ढगाळलेल्या वातावरणात
पावसाची सुरवात
त्याच वातावरणात
नाचतात मोर मनात

ओल्या पावसाने
होतात ओली मने
पण दुष्काळाप्रमाणे
प्रमभंगाचेही येणे

दुष्काळ की सुकाळ
प्रेम की प्रेमभंग
प्रत्येकाचा आपल्या
मनाचाच चंग

पाऊस आणि प्रेम
फरक होता खरा
पाऊस कालाधीन
प्रेम भावनाधीन


 Pravin Raghunath Kale
8308793007
« Last Edit: August 05, 2014, 03:13:15 PM by प्रविण काळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: पाऊस आणि प्रेम
« Reply #1 on: March 01, 2014, 04:57:52 PM »

पाऊस कालाधीन
प्रेम भावनाधीन

छान ...... :)