Author Topic: अग सांग ना, तू अशी गप्प का…  (Read 1514 times)

Offline amol.virkar

  • Newbie
  • *
  • Posts: 1

अग सांग ना,
तू अशी गप्प का…
मी जवळ असताना,
एवढी दूर का…

मला माहीत आहे…
मी अनेकदा चुकतो,
कधी-कधी अपेक्षांना अपुरा पडतो…
तुझ्यावर रागावतो,
हव तसच वागतो,
पण तरीही मी तुझाच ना…

मी तुझा तू माझी,
आयुष्यभराचे साथी…
नाण्यांची बाजू समज,
पटलं नाही तर तक्रार कर…
सारकाही हव ते आपल्याकडे आहे,
पण विश्वास नसेल तर अवघड आहे…

तुला त्रास झाला,
मला लगेच कळत…
विचार करूनच,
मनं कानाडोळा करत…
मार्ग शोधायला शिक,
त्यावर चालायला शिक…
काळजी करू नकोस,
प्रत्येक वळणावर मी असेन,
अग श्वास आहेस तू माझा…