Author Topic: त्याने मला प्रपोज केले  (Read 1716 times)

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
त्याने मला प्रपोज केले
« on: March 01, 2014, 02:40:00 PM »
तो  दिवस  आजून  आठवतो
मी  रोज  शाळेत  जायची
तो  माझ्याकडे  बघायचा
मी  त्यांच्याकडे  बघायची

त्याला  वाटे  मी
मिठीत  घ्यावे
मला  वाटे  त्याने
बेधुंद  करावे

मी  चालले की
तो  ओढनी  गच्च   धरे
न   सोडण्यासाठी
मला वाटे  त्याने   सोडावी

एक  दिवस  मी  ठरवले
त्याला  न  भेटण्याचे
पण  असं  कधी  झालं  तर
तो  खूप   उदास   व्हायचा

हा  खेळ   कुठवर  चालायचा
तो  तिथेच  डोलायचा
त्याने  मला  एक  दिवस
प्रपोज  केले

मी  त्याचा  स्वीकार  केला
त्याने  माझ्या  ओठांना  स्पर्श  केला
त्या  स्पर्शाने  तो  सुकून  गेला
कारण   तो  गुलाब  होता. ..........


                  । कवि-डी ।
                   स्वलिखीत
                 दि. 01. 03.2014
                 वेळ . दुपारी 2. 40
« Last Edit: March 02, 2014, 08:21:38 AM by कवि । डी »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: माझा प्रियकर
« Reply #1 on: March 01, 2014, 04:49:02 PM »

हा हा हा …छान... :D :D :D

Offline कवि । डी.....

 • Jr. Member
 • **
 • Posts: 165
 • Gender: Male
 • कवितेसाठी जन्म आपुला
Re: माझा प्रियकर
« Reply #2 on: March 01, 2014, 05:53:48 PM »
धन्यवाद  मिलींद  कुंभारे  सर---------धन्यवाद.