Author Topic: नाही जमत मला गं ….  (Read 2206 times)

Offline swami sakha

  • Newbie
  • *
  • Posts: 6
नाही जमत मला गं ….
« on: March 05, 2014, 01:17:11 PM »
नाही जमत मला  गं ….

नाही जमत मला  गं
तुझ्यासारखं आढेवेढे घेणं
मनात असूनही बोलायचं ते
पण उगाच ते ओठांत दाबणं

मी आपला वाहतो निर्झर
खळखळणाऱ्या  झऱ्यासारखा
तुझ्याच अवती भोवती भुंगा
असूनही तुझ्या नजरेस पारखा

मी फुलवतो माझे
शब्दांचे मनसोक्त फुलोरे
नाचतो आनंदी फुलवून
तुला पाहता मनपिसारे

मी होतो तुझ्यासाठी कधी
अंगणातला  प्राजक्तचा बहर
तुझ्या डोळ्यांत जागवून मी
होतो कधी रम्य पहाटेचा प्रहर

कधी तुझ्यासाठी नभीचा चंद्र
तर चमचमणारं रुपेरी चांदणं
तुझ्या नकळत मनात शिरून
तुझ्या हृदयी माझं गोंदणं
 
फक्त होऊ दे मला तुझा श्वास
तुझ्या हृदयाचं स्पंदन
लाभू दे मज जन्मभर
आपल्या प्रीतीचे पवित्रं बंधन

- सुनील ..........

Marathi Kavita : मराठी कविता