Author Topic: तिच्या काठची ती ....  (Read 815 times)

तिच्या काठची ती ....
« on: March 12, 2014, 01:44:56 AM »
कपाळावरून गुलाबी गालावर चिकटलेली
केसांची बट
मला पहाताच अलगद उतरलेली तुझ्या
डोळ्यातली लाज
हळूच उचलून गोर्‍या खांद्यावर घेतलेली
कपड्यांची चवड
आणि तू पाठमोरी मावळत गेलीस
ती वळण वाट   


पहाताच रुतून बसलीस काट्यासारखी
मनाच्या टाचेत
रोज सकाळी घालत होतीस मनाच्या फुलदाणीला
पाणी ओंजळभरून
धुण्याच्या टोपलीतला एक एक कपडा काढत
होतीस पिळून
पण त्यासोबत माझं सुकं हृदय ओलावत होतं
स्पंदन भरून 
 

मी येत असे रोज तिच्या काठी पहायला तुझ्या
पैंजणांची छुमछुम
तू  जात होतीस लाऊन मनाला तुझ्या
साडीचा रंग
अन मी स्वीकारत असे उद्याच्या भेटीचं तुझ
आश्वासन अबोल
पाहिलास का नाही कधी ? माझ्या डोळ्यात
रूप तुझं


पक्ष्यांच्या थव्यासारखे जात होते
दिवसांमागून  दिवस
तिच्यासोबत माला सुद्धा लागली होती तुझ्या
स्पर्शाची आस
वाटलं भरून टाकावी मनाच्या सदर्‍यांनी तुझी
धुण्याची  टोपली
पण आता रोज जगायच्या होता आपला अर्धा
तिच्याकाठचा संसार


चंद्रशिवाय रात्र होते तसा अमावास्येचा दिन
उजाडला एक
तिच्या तोंडचं पाणीच पळालं, कारण तू  आली
नव्हतीस आज
गुंतून गेलो काही दिवस ओढण्यात जग
रहाटीचा गाडा
पण रोज रात्री तुझी ओली आठवण झोपत
होती ऊशाला


वर्षांनंतर चुकलो वाट गावाची झाले एकदा
निमित्य सहज
आलो तिच्या काठी परत बांधून तुझे ओले
स्मरणपाश
बायकांच्या कल्लोळात शोधताना तुला झालो
होतो कासावीस
शेवटी दिसलीस तू अन सुक्या घशात पडले
पाण्याचे थेंब गार


तिच्या प्रवाहात उसळला आगीचा डोंब, माझे
गेले अवसान
विस्कटलेले केस आणि पुसत होतीस निरभ्र
कपाळावरचा घाम
आणखीनच उजळली सूर्यामध्ये तुझी मळकट
शुभ्र साडी
अन पोटात होते तुझ्या आईपण कदाचित
महिन्यांचे आठ      


..... अनुराग
http://kavyanurag.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता