Author Topic: काय सांगू सखे  (Read 998 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
काय सांगू सखे
« on: March 13, 2014, 06:44:47 PM »
काय सांगू सखे
सारे असे का झाले
मलाच नाही तर
तुलाही नाही जमलं
हे सारे टिकवणं

का झाल असं
असेल कारण काहीसं
अगदीच क्षुल्लक
पण त्या कारणांमुळे
राहणार नाही प्रेम शिल्लक

का झाल अस
चूक असेल कधी माझी
तर कधी तुझी
समजून घ्यायला हव होत
कधी मी तर कधी तू

समजायला हवी होती चूक
आपल्या दोघांनाही
जपताना नाती आपल्याला
हेही उमजायला हवे होते

विसरून सगळे सार
आज पून्हा होवू तयार
जीवनाच्या वाटचालीत
करू पून्हा एक नवीन सुरुवात
यासाठी माझी तुला
पून्हा एक आर्त साद
समजून घे सखे मला
तूझाच मी...
सखे तूझाच मी.....


Pravin Raghunath Kale
8308793007
« Last Edit: August 05, 2014, 03:06:15 PM by प्रविण काळे »

Marathi Kavita : मराठी कविता