Author Topic: ती जरा वेगळीच होती....  (Read 2429 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
ती जरा वेगळीच होती....
« on: March 15, 2014, 03:53:59 PM »
ती जरा वेगळीच होती....!!!
पावसातील सरीसारखी,
चिबं अशी भिजवणारी....
मातीचा नवासा सुगंध,
मनी माझ्या पसरवणारी....!!

ती जरा वेगळीच होती....!!!
ह्या सुसाट हवेसारखी,
स्पर्श करुन जाणारी....
अनं फुलपाखरासारखी,
उंच भरकटत उडणारी....!!
ती जरा वेगळीच होती....!!!

स्वप्नात मनसोक्त माझ्या,
सोबत मनात वावरणारी...
अनं हातात हात घालुनी,
वाटेवरूनी माझ्यासवे चालणारी......!!
ती जरा वेगळीच होती....!!!!

©स्वप्निल चटगे. 
« Last Edit: March 16, 2014, 12:44:11 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता