Author Topic: अशी हवी प्रियसी  (Read 1618 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
अशी हवी प्रियसी
« on: March 19, 2014, 01:48:56 PM »
जिचे सुंदर असेल रूप,
आवडेल मला खूप ,
खुणवेल गुपचूप,
अशी हवी प्रियसी !

जिच्या गोंडस अश्या भावना,
सुखवील माझ्या मना,
अशी या सज्जना,
हवी प्रियसी !

जिचे नयन जणू हिरनिचे,
सौंदर्य फुलविल त्या तरुणीचे,
हेचि मागणे प्रभू चरणीचे,
अशी हवी प्रियसी !

जिला असेल माझा लळा,
वर्शवेल जी प्रेमाचा सडा ,
जिच्यासाठी जाणवेल कडकडा,
अशी हवी प्रियसी !

अश्या माझ्याची भावना,
आहे अपूर्ण तिच्याविना,
सांगा अशी या सज्जना,
मिळेल प्रियसी ??
                 -  प्रसाद पाटील
« Last Edit: March 21, 2014, 11:26:32 AM by Prasad.Patil01 »

Marathi Kavita : मराठी कविता