Author Topic: तिच्या त्या सहवासात...  (Read 1301 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तिच्या त्या सहवासात...
« on: March 21, 2014, 12:54:23 AM »
तिच्‍या त्‍या गुलाबी डोळ्यात,
एक वेगळीच धुंद नशा साठायची...
झाकताच नयन अन् माझे,
मनी माझ्या ती आठवायची...

तिच्‍या त्‍या नशिली ओठात,
गोडवा असा मधाळ असायचा...
स्‍पर्श करताच तिच्‍या ओठी,
अंतरंगात प्रेमाचा मोहर फुटायचा...

तिच्‍या त्‍या कुरळ्या केसात,
हलकासा सुगंध साठायचा...
जवळुन जाता ती माझ्या,
आसपास असलेली भासायचा...

तिच्‍या त्‍या पापण्‍याच्‍या अदा,
पाहताना मन गुंतायचा...
काय माहित मी पुन्‍हा,
स्‍वताःला त्‍यात गुंतायचा...
------------- -------------
स्वयंलिखीत :-
© स्‍वप्‍नील चटगे
21-मार्च-2014

Marathi Kavita : मराठी कविता